LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर...🇮🇳🇮🇳🇮🇳भारत माता की जय... 🇮🇳🇮🇳🇮🇳📍 मंगळवेढा

https://youtu.be/bYNdJrwnDQo?si=SEoO4NwOWgyGCLYT


'ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा सन्मान करत आज हजारो मंगळवेढेकरांनी मोटार सायकल तिरंगा यात्रेत भाग घेतला. भारतमाता आणि सैन्यदलाच्या जयघोषांनी निनादलेले रस्ते, हाती तिरंगा, हृदयात राष्ट्रभक्ती... हे दृश्य अविस्मरणीय होतं.

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारतीय सेनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, हा नवभारत आहे, जो आपल्या शत्रूंना घरात घुसून प्रत्युत्तर देतो !

पाकिस्तानसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला ठोस उत्तर देत, भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की, आपली सार्वभौमता आणि सुरक्षेचा कुणीही भंग केला तर त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल.

भारतमाता आणि भारतीय सैन्यदलाच्या जयघोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती ही भारतीय सैन्यदलाला नागरिकांचा किती मोठा पाठिंबा आहे, याची साक्ष देणारी होती.

या यात्रेत माझ्यासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय व व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील अनेक देशप्रेमी मंगळवेढाकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून भारतीय सेनेच्या कार्याला सलाम केला.

आपल्या देशासाठी, लाखो सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या सर्व भारतीय जवानांना  मानाचा सलाम!

जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

0 Comments