LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?*👉 *काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल**सोलापूर शहर काँग्रेसच्या वृत्तीने MIDC जळीत कांड आणि नालेसफाई संदर्भात सोमपा आयुक्तांना निवेदन*



खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली MIDC जळीत कांड ची चौकशी आणि मदत व शहरातील पावसाळी कामे नालेसफाई संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात? असा सवाल चेतन नरोटे यांनी केला. अश्या प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की, सोलापूरातील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाइल्स ला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये दुर्दैवाने मन्सुरी आणि बागवान कुटुंबियातील आठ जणांचा मृत्यू झाला. कोट्यावधी रुपयाचे मालमत्तेचे नुकसान झाले. या आगीच्या घटनेबाबत आम्ही चिंता व्यक्त करतो ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुख व्यक्त करतो. झालेली घटना गंभीर आणि चिंताजनक असून सोलापूर शहरात यापूर्वीही आगीच्या अनेक घटना घडून अनेक कारखानदारांचे, नागरिकांचे कोट्यवधीचे मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेमुळे जीवितहानी, आर्थिक नुकसान, आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटेनच्या वेळी अग्निशमन दल वेळेवर पोहोचली नाही असे बोलले जात आहे. आग कशामुळे लागली याचे कारण ही कळाले नाही. या आगीच्या घटनेची तातडीने चौकशी करून त्यामागील कारणे शोधली जावेत आणि पुन्हा अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावेत. मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. त्यांना भरीव मदत मिळावे. तसेच अक्कलकोट रोड MIDC येथे कायमस्वरूपी अग्निशमन दल स्टेशनची उभारणी करणे, गाड्यांना पाणी भरण्यासाठी वॉटर फिडर पॉईंट निर्माण करणे, गाड्यांची संख्या वाढविणे, अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करणे, फायर ऑडिट करण्यात यावे, प्रत्येक कारखान्यात आग लागू नये आणि आग लागल्यास काय काय उपाययोजना करावे यासाठी जनजागृती करण्यात यावी.

तसेच सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाला सुरू झाला असून मागील काही वर्षात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत आहे. काल परवा झालेल्या पावसात अनेक वसाहतीत पाणी शिरल्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांना होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी ताबडतोड नालेसफाई, नाले रुंदीकरण, चेंबर सफाई, अतिक्रमण काढणे, पावसाने पाणी कुठे साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करावे, नाल्यांजवळ साचणाऱ्या गाळाची तात्काळ विल्हेवाट लावावी, साचलेल्या पाण्यात फवारणी करण्यात यावी, पाणीपुरवठा दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, धोकादायक इमारतीच्या घरमालक आणि रहिवाश्यांशी समन्वय साधून त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी कार्यवाही तातडीने राबवावी, आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज ठेवावे, सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने याची उपलब्धता करून द्यावी मान्सून दरम्यान कोणत्याही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, मा. नगरसेवक अशोक निंबर्गी, विनोद भोसले, नरसिंग कोळी, मा. नगरसेविका परवीन इनामदार, फिरदौस पटेल, अनुराधा काटकर, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, एजाज बागवान, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापूरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, मिडिया प्रमुख तिरूपती परकीपंडला, विद्यार्थी संघटना अध्यक्ष नागेश म्याकल, बसवराज म्हेत्रे, अशोक कलशेट्टी, हसीब नदाफ, नागनाथ कदम, अँड केशव इंगळे, शशिकांत जाधव, रुस्तुम कंपली, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, संजय गायकवाड, राजेश झंपले, गिरिधर थोरात, भीमराव शिंदे, करीमुनिसा बागवान, ज्योती गायकवाड, शाहू सलगर, मुमताज तांबोळी, द्रौपदी शिवशरण, चंदू नाईक, आकाश जांभळे, रुकैयाबानु बिराजदार, शशी गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments