LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*जिल्हाध्यक्षपदी अॅड राजेश भादुले तर सचिव पदी प्रा नितीन झाडबुके* महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेची बैठक सोलापूर येथील लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यामध्ये पुढील तीन वर्षासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध पार पाडल्या.


    सभेचे माजी प्रांताध्यक्ष व मार्गदर्शक श्री प्रबुद्धचंद्र झपके सर, जिल्हाध्यक्ष श्री सुरेश आप्पा घोंगडे, कार्याध्यक्ष श्री मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र मायनाळ, श्री धनंजय मेनकुदळे, श्री दिलीप बिराजदार सर, श्री अशोक करजोळे, श्री बाळासाहेब कारंडे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पदांच्या बिनविरोध निवड जाहीर करण्यात आल्या. 
     यामध्ये महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाज सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरचे अॅड. श्री राजेश भादुले, यांची, जिल्हा सचिव पदी प्रा नितीन झाडबुके तर सोलापूर शहराध्यक्षपदी सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन श्री नरेंद्र गंभीरे  यांची निवड झाली. 
       तसेच जिल्हा खजिनदारपदी श्री प्रकाश हत्ती, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी श्रीमती पुष्पाताई गुंगे,  
 महिला आघाडी शहर अध्यक्ष पदी सौ ऐश्वर्या कुलकर्णी यांची निवड झाली.
      सदर निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments