भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी साेमवारी भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षावर संसदीय समितीला माहिती दिली. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले यासंदर्भातील माहितीचा यामध्ये समावेश हाेता. या बैठकीला साेलापूरच्या खासदार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती हाेती.
देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. ही भारताची लष्करी प्रतिक्रिया होती ज्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्या. भारतीय नागरी आणि लष्करी मालमत्तेला येणाऱ्या धोक्यांबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
भारताने सिंधू जल करार स्थगित करणे आणि सर्व विद्यमान पाकिस्तानी व्हिसा रद्द करणे यासह राजनैतिक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे सीमापार दहशतवादाविरुद्ध कडक संदेश देण्यात आला आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय सुरक्षा उपायांना पाठिंबा दिला. देशाला राष्ट्रीय एकतेवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments