श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सन १९८२ मध्ये झालेल्या पहिल्या नगररचना योजनेतील बाधीत मिळकतदारांना बाधीत जागेच्या मोबदल्यात सर्व्हे नं. ७१ विस्थापित नगरमध्ये जागा दिलेल्या प्रकरणातील कागदपत्रांच्या तपासणीसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांची नियुक्त करण्यात आली असून याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केला आहे.
पंढरपूर विकास आराखड्या (कॉरिडॉर) बाबत दि. १ व २ मे २०२५ रोजी केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील नागरिकाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सन १९८२ मध्ये नगररचना योजना राबविली होती. परंतु त्यावेळी विस्थापित झालेल्या मालमत्ताधारक यांना प्लॉट वाटप करणेत आले परंतु अनेक मालमत्ताधारकांना अद्याप पर्यंत प्लॉट वाटप झले नाही व खरेदीखत दिलेले नाही. अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या अनुषंगाने विस्थापितनगर येथील जागेबाबत कागदपत्र तपासणीसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
तसेच पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ७१ विस्थापित नगर मधील प्रकरणांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा, त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेने सर्व्हे नं. ७१ विस्थापित नगरमध्ये जागा दिलेल्या प्रकरणातील कागदपत्रांची तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावीत असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
०००००००
0 Comments