प्रतिनिधी- करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ही निवडणे म्हणजेच करिअर शोधणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मंगळवेढा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण हे तर पंढरपूर येथील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवक नेते प्रणव परिचारक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.गोसावी हे बोलत होते. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जवळपास ७०० गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग, ट्रॉफी व सन्मानपत्र अशा रूपामध्ये सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आयुष्यात पदवी, पैसा व नोकरी या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण आपल्या जगण्याची दृष्टी काय आहे ? जगण्याचा संकल्प काय आहे? हे गूढ उलगडण्यासाठी आपण शिक्षण प्रवाहात संस्कार आणि संस्कृती यांचे संवर्धन करून प्रेरणादायी तत्वे आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आई-वडीलांचे कार्य संस्कार डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी नागरिक म्हणून देशाच्या आणि समाजाच्या कामी आले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांशी मनोगतपर संवाद साधताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, कोणत्याही यशाने हुरळून व अपयशाने खचून न जाता स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे. आमदार म्हणून तुमच्यासमोर आज उभा असलेले समाधान आवताडे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीशी व मोठ्या संघर्षाचा सामना करून आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांच्या बळावर उभा राहिलेले नेतृत्व असल्यामुळे जीवनामध्ये संघर्षाला न डगमगता आपण विजयाला खेचून आणत यशस्वी झाले पाहिजे असे त्यांनी सांगताच उपस्थित विद्यार्थी व पालकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला.
यावेळी प्राथमिक शिक्षण जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर अर्जुन भोसले, माध्यमिक विभाग उपशिक्षणाधिकारी श्रीमती हवेली, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूर मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी योगेश कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पंढरपूर गटविकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक तैयुब मुजावर, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक वाटचालीबद्दल सखोल आणि आवश्यक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, नवनाथ पवार, माजी प्राचार्य प्रा. येताळा भगत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, संजय ननवरे, यशोदा पतसंस्थेच्या नीला आटकळे, राजेंद्र सुरवसे, माजी संचालक सुरेश भाकरे, शिवाजीराव नागणे, दत्तात्रय जमदाडे, सरोज काझी, प्रकाश गायकवाड, दीपक वाडदेकर, द्रोणाचार्य हाके, तुकाराम कुरे, डी. सी.जाधव, विनायकराव यादव, चंद्रकांत पडवळे, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, अंबादास कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, ज्ञानदेव जावीर, महादेव जाधव, संपादक दिगंबर भाकरे, सुदर्शन यादव, दादासाहेब ओमणे, गौडाप्पा बिराजदार, मोहन बागल, बाबासो पाटील, दत्तात्रय ताड, विश्रांती भुसनर, खंडू खंदारे, महादेव लवटे, यांचेसह अनेक मान्यवर व शिक्षण प्रेमी तसेच दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.
0 Comments