LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणिती शिंदे यांच्या तीन कोटी रुपये विशेष निधीतून होणाऱ्या अत्याधुनिक कबड्डी मैदानाच्या बांधकामाची सोमपा आयुक्तांकडून पाहणी, काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.*

आपल्या महाराष्ट्राला मातीतील खेळाची उज्ज्वल परंपरा आहे. त्यामुळे आपल्या मातीतील कबड्डी खेळाला वैभव मिळवून देण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम संधी देवून भविष्यासाठी तयार करण्यासाठी, कब्बडीचे माहेरघर असलेल्या "सेटलमेंट मैदान" येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या विशेष निधीतून तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीतून अत्याधुनिक कब्बडी मैदानाचे बांधकाम सुरू झाले असून या कब्बडी मैदानाच्या बांधकामाची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत सोलापूर महानगरपालीकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना मैदानाचे काम दर्जेदार आणि उत्तम करण्यात यावे अशी सूचना करून मैदानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments