मंगळवेढा येथील प्रांत अधिकारी बी आर माळी यांनी अनुसूचित कोळी महादेव जमातीच्या उमेदवाराकडे आवश्यकते पुरावे असताना सुद्धा जात प्रमाणपत्रपासून वंचित ठेवुन अन्याय, अत्याचार केला आहे असा आरोप सकल कोळी महादेव ,मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमातीचे अध्यक्ष व अभ्यासक प्रा बाळासाहेब बळवंतराव यांनी केला असून प्रांताधिकारी माळी यांच्या अजब कारभाराची सगळीकडे चर्चा होत आहे.
अर्जदार अरविंद नाईकवाडी हा मंगवेढा येथील अत्यंत गरीब,अल्पशिक्षित तरुण, मोलमजुरी करुन कुटुंब चालवतो घरातील सर्व अशिक्षित आहेत. त्याने महाराष्ट्र अनु.जाती,जमाती,भटके विमुक्त, मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 व नियम2003 मधील तरतुदींनुसार विहित नमून्यात कोळी महादेव जमातीचे जातप्रमाणपत्रासाठी दि 7 मार्च2025 रोजी उपविभागीय अधिकारी बी आर.माळी यांचे अर्ज केला होता. माळी यांनी तो अर्ज स्थानिक सर्कल चौकशीसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. मंडल अधिकारी यांनी स्थानिक जेष्ट व्यक्तीशी चौकशी करुन व प्रत्यक्ष अर्जदारांशी चर्चा करून अर्जदार अरविंद नाईकवाडी हे कोळी महादेव जमातीचेच आसल्याचा अहवाल दिला आहे. दि .21 मे रोजी सुनावणी ही घेतली त्यावेळी त्यांच्या शंकाचे कायदेशिर निरसन केले होते.
तरीही कायद्यातील तरतुदीप्रमाणे जोडलेले पुरावे, शपथपत्र ,सर्कल चौकशी अहवाल या सर्वांना हारताळ फासत दावा कोणत्याही परिस्थितीत नाकारायचाच या हेतुने प्रांताधिकारी बी आर माळी The scheduled castes And Scheduled Tribe Order (Amendment. Act 1956. या कालबाहय झालेल्या कायद्याचा आधार घेतला घेतला आहे.
अर्जदाराने अधिनियम 2000 मधील 9ख प्रमाणे शपथपत्र व इतर दोन शपथपत्र जोडले आहे. 1950 पुर्वीचा पुरावा असावा असे कोठेही कायद्यात नमूद नाही त्यामुळे 1950 पुर्वीचा जातीचा पुरावा मागू नये असा मा हायकोर्ट मुंबई यांचे जजमेंट दिले आहे.
अधिनियमातील तरतुदीप्रमाणे 1950 पुर्वी असेल तर घ्यावा नसेल रहिवासी पुरावा घ्यावा असे म्हटल्याप्रमाणे 1950 पुर्वीचा रहिवासी पुरावा जोडला आहे. यापुर्वीच्या प्रांताधिकाऱ्यांना अशाच एका प्रकरणातत मा हायकोर्टाने . 2500 रुपये दंडही केला आहे.
प्रांताधिकारी बी आर.माळी यांनी अर्जदाराचा दावा खोटा ठरवून अनुसुचित जमातीच्या उमेदवार अन्याय केला असून त्याला त्याच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवून अपिलात जाण्याची जाण्यासाठी पत्र दिले आहे .
कायद्यातील तरतुदी प्रमाणे आवश्यक तो कोणताही एक पुरावा मिळाल्यानंतर जात प्रमाणपत्र द्यायला हवे परंतु माळी साहेब यांच्या मनात महादेव कोळी जमाती विषयी हे पूर्वग्रहदूषित आहे. उमेदवाराचे ऐकून घेण्याची मनस्थिती ही नाही जात प्रमाणपत्र कसे देता येईल यापेक्षा ते कसे नाकारता येईल याविषयी विचार करून ते नाकारतात. त्यामुळे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील महादेव कोळी महादेव जमातीवर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी माळी यांच्या विषयी समाजात प्रचंड असंतोष पसरला असून. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी पालकमंत्री ना.जयकुमार गोरे, मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे व कोळी महादेव जमातीच्या लोकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रा.बाळासाहेब बळवंतराव यांनी दैनिकाशी बोलताना केली आहे.
0 Comments