LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती, मंदिर संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे, बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा - गणेश अंकुशराव


पंंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागली असून आज दुपारी झालेल्या पावसात मंदिराच्या छताला गळती लागल्याचं दिसून आले आहे. मंदिराच्या संवर्धनाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असुन बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू. असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे.

आज गणेश अंकुशराव हे मंदिरात दर्शनासाठी गेले असताना संपुर्ण मंदिर गळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी या घटनेचे छायाचित्रे काढली, व्हिडिओ काढले असुन मंदिर समिती च्या मंदिर संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दाखवून दिले.

हजारो वर्षांपासून चे पुरातन श्रीविठ्ठल मंदिर असे पावसाळ्यात गळत असल्याचे कधी दिसले नाही, परंतु मंदिराचे संवर्धनाचे काम झाल्यानंतर असे विदारक चित्र दिसुन येत आहे, या संपूर्ण कामात खुप मोठा भ्रष्ट कारभार झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिरात आले होते त्यांनी सुध्दा मंदिर संवर्धनाचे कामकाजाची पाहणी करायला हवी होती, परंतु तसे घडले नाही, मंदिर समिती प्रशासनाकडून या कामात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे शासनाने संबंधित बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांची व या कामाची सखोल चौकशी करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
............
मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
 आपला 
 गणेश अंकुशराव 
मोबाईल: +91 93702 71730

Post a Comment

0 Comments