LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवातदि. २५ ऑगस्ट पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन




पंढरपूर:- ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून बुधवार, दि २३ जुलै २०२५ पासून ते सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.’ अशी माहिती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.), पंढरपूरचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.     
       बारावी सायन्स नंतर असलेल्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून बुधवार, दि २३ जुलै २०२५ पासून सुरवात झाली आहे. जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दि.२९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२५ या दरम्यान करता येईल. या प्रक्रियेनंतर दि.०३ सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर पाहता येईल. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आपल्या प्रवर्गानुसार योग्य ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  संस्थेचे संस्थापक डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, प्राचार्य प्रा.सतीश मांडवे व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. याचा लाभ बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना डी.फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. पंढरपूर परिसर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीनुसार सन २००६ साली कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.) महाविद्यालय स्थापन झाले होते. आदरयुक्त शिस्त व संस्कार यासाठी प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत देखील सातत्याने आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यातून हे महाविद्यालय पहिल्याच फेरीत फुल्ल होत असल्यामुळे या महाविद्यालयातच आपल्याही पाल्याला शिक्षण घ्यावे या हेतूने पालकांच्या मागणीला जोर चढल्यामुळे यावर सारासार विचार करून चार वर्षापूर्वी (२०२१) आणखी एका डी. फार्मसी या कोर्सची सुरवात कॉलेज ऑफ फार्मसी (डिग्री) महाविद्यालयात करण्यात आली. वार्षिक परीक्षांचे निकाल, वसतिगृहाची सुविधा, रात्र अभ्यासिका आदी विद्यार्थी पूरक सुविधांमुळे पालक व विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे ओढा वाढत आहे. डी. फार्मसीच्या प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.सौरभ कौलगी (मोबा.क्र.-९४२१५८८९२३) व डॉ.वृणाल मोरे (मोबाईल– ९६६५१९६६६६) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments