LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीतील तृतीयपंथीनी घेतली पालकमंत्र्यांची भेट..वंचिताचा कैवारी माऊली हळणवर यांनी घडवून आणली ही भेट


राहण्यासाठी घर नाही जागा नाही आम्ही बेवारस जीवन जगतोय म्हणत आज तृतीय पंथी लोकांनी पालकमंत्री महोदयांची भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या
आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे हे पंढरपूर येथे आले असता पंढरपूर शहरातील तृतीयपंथी बांधवांनी 
वंचित शोषितांचे कैवारी माऊली भाऊ हळणवर यांना सोबत घेऊन पालकमंत्री महोदयांना निवेदन दिले की पंढरपूर शहरात तृतीयपंथीची  संख्या 25 ते 30 असून हे बेघर आहेत घरातील लोक दुर्लक्ष करतात घरी राहू देत नाहीत घरात त्यांची हेळसांड होत असते ते आपल्या गुरुच्या घरी राहत असून दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सात ते आठ लोक राहत असतात रस्त्यावरती व बाजारात मागून आपला पोटापाण्याचा प्रश्न सोडवत असतात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत त्यांनी मागणी केली केली आम्हाला रेशन कार्ड मिळावे आधार कार्ड मिळावं व सन्मानानं जगता यावं याकरता पंढरपूर शहरांमध्ये राहण्यासाठी जागा व शासनाकडून घरकुल मिळावे अशी मागणी त्यांनी केली गोरगरिबांचा विस्थापितांचा प्रश्न तातडीने सोडवणारा पालकमंत्री आपली ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर असून अनेक गोरगरिबांना आपण मदत केलेली आहे आम्हाला ही मदत करा व माणसा सारखे जगण्याची संधी द्या अशी विनंती  केली त्यावेळी ना. जयकुमार गोरे भाऊनी आस्थेने  या तृतीयपंथी बांधवांची चौकशी केली सर्व ऐकून घेतले नक्कीच आपल्या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले यावेळी माऊली भाऊ हळणवर यांचे सह परसु पवार सिमा माने, विष्णवी वाघमारे ,वैशाली शिरसट ,नगमा गायकवाड ,सोनाली साबळे, निता माने, आयशा माने  हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments