LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

...नाहीतर पंढरपुरात साठलेला कचरा पॅकिंग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानाने पाठवू - गणेश अंकुशराव



पंंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी वारी नंतर पंढरपूर शहर व परिसरातील स्वच्छतेचा फक्त फार्स केला असून शहरासह, उपनगरात व दर्शन रांग परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ने शहरातील स्वच्छेतेसाठी दरमहा दहा लाखांचा ठेका दिलाय परंतु सदर ठेकेदारावराकडून स्वच्छता केली जात नसल्याने तातडीने हा ठेका तातडीने रद्द करा अन्यथा पंढरपुरात साठलेला कचरा गोळा करून तो बॉक्समध्ये पॅकिंग करून विमानाने दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवू! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

गणेश अंकुशराव यांनी नूकतीच पंढरपुरातील स्मशान भूमी नजीक असलेल्या दर्शन बारी परिसरात जाऊन पाहणी केली असता येथे ठिकठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. 

वास्तविक पाहता या ठिकाणी दररोज स्वच्छता करण्यासाठी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत दरमहा दहा लाख म्हणजेच वर्षाकाठी एक कोटी वीस लाखांचा चुराडा केला जातो. मात्र कोट्यवधींचा ठेका घेऊनही सदर ठेकेदारामार्फत स्वच्छतेचे काम केले जात नसल्याने दर्शन रांग व  मंदिर परिसरात, प्रदक्षिणा मार्ग अशा विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळून येतेय. त्यामुळे हा ठेका मंदिर समिती ने रद्द करावा आणि भाविकांकडून देणगी स्वरुपात आलेल्या दानाची अशी उधळपट्टी थांबवावी अन्यथा आम्ही हा कचरा गोळा करून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह आरोग्य मंत्री व संबंधित मंत्र्यांच्या घरी पार्सल पाठवून देऊ असा खणखणीत इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

श्रीविठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धन कामात झालेला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता स्वच्छतेच्या ठेक्याबाबतही गणेश अंकुशराव यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली असून मंदिर समितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.

चौकट: 
*म्हणून पंतप्रधानानांना पाठवणार!*

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे तिर्थक्षेत्र पंढरी नगरी वर विशेष प्रेम आहे, त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरी नगरीची कशी दुरावस्था झालीय, इथल्या मंदिर समिती प्रशासनाकडून कसा भ्रष्ट कारभार चालु आहे, भुवैकुंठ पंढरी नगरीत कसे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे? हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना समजावे, वस्तुस्थिती माननीय पंतप्रधानांना कळावी म्हणून आम्ही येथील साठलेला कचरा पंतप्रधानांना विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. असे स्पष्टीकरण गणेश अंकुशराव यांनी दिले आहे.
...................
मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
 आपला 
 गणेश अंकुशराव 
मोबाईल: +91 93702 71730

Post a Comment

0 Comments