LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीने करून घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले.



                                                                   -माजी विद्यार्थी व गुगलचे सनी तोडकरी
अमेरिका स्थित माजी विद्यार्थ्यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर- ‘डॉ. रोंगे सरांनी २००८ साली जे आमच्याकडून परिश्रम करून घेतले त्याचे आज चीज झाले असून आमच्या आयुष्याची पायाभरणी अगदी उत्तम केल्यामुळे आमच्या यशाची इमारत आज उंच शिखरावर पोहोचली आहे.’ असे प्रतिपादन अमेरिकेत मध्ये स्थायिक झालेले स्वेरीचे माजी विद्यार्थी सनी तोडकरी यांनी व्यक्त केले. 
         १९९८ साली संस्थेचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे सरांनी गोपाळपूरच्या माळरानावर केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे द्वार खुले केले. तेंव्हापासून आजपर्यंत जवळपास २७ वर्षात शिक्षणात विविध उपक्रम राबवत ‘पंढरपूर पॅटर्न’ यशस्वी पणे राबवित आहेत. अशातच शेकडो विद्यार्थी करिअरसाठी परदेशात स्थायिक झाली आहेत. सन २००७ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून उत्तीर्ण झालेले व सध्या गुगल या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी सनी देविदास तोडकरी हे आपल्या पत्नीसह सदिच्छा भेटीच्या निमित्ताने स्वेरीत आले होते. याप्रसंगी स्वेरीमध्ये त्यांनी विद्यार्थी दशेत करून घेतलेल्या परिश्रमामुळे हे चांगले दिवस पाहायला मिळाले असल्याचे आनंदाने सांगितले. मुळचे महूद (पंढरपूर) मधील असणारे सनी तोडकरी हे गेल्या ६ वर्षांपासून कॅलिफोर्निया (युनायटेड स्टेट्स) येथे गुगलमध्ये कार्यरत आहेत. त्यांना निवेदिता अनिल वडगावकर ह्या सहचारिणी म्हणून लाभल्या असून त्या देखील स्वेरीच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. सौ.निवेदिता तोडकरी ह्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून २००८ बॅचच्या पासआउट विद्यार्थिनी आहेत. दोघेही भारतात आले असताना त्यांनी स्वेरीला भेट दिली. तोडकरी दाम्पत्यांचे स्वेरीत सचिव प्रा. सुरज रोंगे यांनी स्वागत केले. तोडकरी दाम्पत्यांनी आनंदाने सर्व विभागांना भेट देवून प्रगतीचा आलेख जाणून घेतला. यावेळी सनी तोडकरी मनसोक्त व्यक्त होत होते. ते म्हणाले ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून उत्तीर्ण असूनही सध्या गुगल या सॉफ्टवेअर कंपनीत मी कार्यरत आहे. कोअर ब्रँच मधून घेतलेल्या शिक्षणातून आपण इंजिनिअरिंगच्या कोणत्याही क्षेत्रात करिअर करू शकतो. शिक्षण स्वेरीमध्ये  ट्रिपलपीई ने मला खूप मदत केली असून प्रामाणिकपणे परिश्रम केल्यास काहीही अवघड नसते' हे डॉ. रोंगे सरांचे वाक्य कायमचे मनात घर  करून राहिले आहे. ट्रिपलपीई मध्ये दररोज ५ सेटेंन्स, प्रॉक्टर हे सर्व प्रामाणिक पणे फॉलो केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात कॉलेजने दिलेल्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच असतात हे कॉलेज संपल्यावर ज्यावेळी नोकरीसाठी, मुलाखतीसाठी जातो तेंव्हा समजते. केवळ ट्रिपलपीई मुळे मला लार्सन अँड ट्रुबो, सुझलोन,महिंद्रा इत्यादी चांगल्या कंपन्यांमध्ये भरती होण्यास मदत झाली.  दुसऱ्या वर्षात असताना डॉ. रोंगे सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यास सांगितले. तसेच नियमितचा अभ्यास व विविध उपक्रमात सहभाग घेतल्यामुळे आत्मविश्वास देखील वाढला. जीवनात संयम राखणे, स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करणे तसेच 'नम्रपणे सादरीकरण केल्यास आपल्या कार्याची दखल घेतली जाते' हा कानमंत्र आयुष्यात उपयोगी ठरला', असे सांगून विद्यार्थी दशेतील अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी माजी विद्यार्थिनी निवेदिता तोडकरी यांनी देखील स्वेरीच्या आदरयुक्त शिस्तिचा आयुष्यात फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, सचिव प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. श्रीकृष्ण भोसले, डॉ. सुमंत आनंद, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे, डॉ. सचिन खोमणे यांच्यासह इतर आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments