पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके, ॲडव्होकेट शक्तिमान माने या दोघांनी वकील संरक्षण कायदा पारित व्हावा. यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी एडवो ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट संदीप रणनवरे, ॲडव्होकेट राजेश चौगुले इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत वकिलांवर प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. काही घटनांमध्ये वकील दाम्पत्याचा खून झालेला असून अनेक वकिलांना गंभीर इजा झाली आहे. तरीही गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र शासन "एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट" लागू करण्यास टाळाटाळ करत आहे.
याच निष्क्रियतेविरोधात पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण करणाऱ्यांमध्ये ॲड.प्रतापसिंह शेळके, ॲड. शक्तीमान माने आणि इतर वकील सहभागी झाले आहेत.
यामध्ये एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ लागू करावा.वकिलांवरील हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ने या प्रश्नावर सक्रिय पावले उचलावीत.वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. या कायद्याच्या अभावामुळे वकिलांचे जीवन असुरक्षित झाले असून, सरकार व प्रशासन केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेत आहे.
याबाबत जर यावर तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप धारण करेल. असा इशारा पंढरपूर अधिवक्ता संघाने दिला आहे. या मागणीला मनसेने पाठिंबा दिल्याने लवकरच वकील बांधवांचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments