सोलापूर शहरात जवळजवळ ५ ते ६ लाख पद्मशाली समाज बांधव राहतात. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांसाठी पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांचा भव्य असे पद्मशाली तेलगू भवन बांधण्याचा मनोदय आहे.
हे पद्मशाली तेलुगू भवनम अक्कलकोट रोड येथील पद्मशाली जाती संस्थेच्या स्वः मालकीच्या जागेवर बांधण्यात असून त्या तेलुगू भवन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उपक्रम आणि अक्कलकोट, गाणगापुर, पंढरपूर, तुळजापूर या तीर्थ क्षेत्राला जाणाऱ्या भाविकांना वरील भवनमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे.
या पद्मशाली तेलुगू भवनच्या बांधकामासाठी अंदाजे रु. ०३ ते ०४ कोटी खर्च येणार आहे. त्यासाठी नुकतेच तेलंगणा सरकारने ०१ कोटी रुपये निधी जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री मा. अजित पवार साहेब यांच्याकडे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महांकाली येलदी, सरचिटणीस संतोष सोमा, अंतर्गत इशोब तपासनीस रमेश कैरमकोंडा, तिरुपती परकीपंडला यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पद्मशाली तेलुगु भवनासाठी महाराष्ट्र शासनाकडून रु. ०१ कोटी निधी देऊन सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मा. संतोष भाऊ पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ०१ कोटी निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
0 Comments