प्रतिनिधी-
चालू गळीत हंगामात पावसाने लवकर सुरुवात केल्याने उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हंगाम मोठा होणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडा असा कार्यमंत्र आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी कारखान्याच्या रोलर पूजन वेळी बोलताना कारखाना प्रशासनाला दिला.
आवताडे उद्योग समूह संचलित आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.नंदूर या साखर कारखान्याचा या गळीत हंगाम 2025-26 हंगामातील रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन श्री संजय आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
ते बोलताना पुढे म्हणाले की पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून या साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तीन गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. कोणत्याही साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या शेतकरी व ऊस उत्पादकांच्या जीवनामध्ये आर्थिक मार्गाने सुबत्ता आणण्यासाठी आम्ही सार्वजनिक प्रयत्नवादी राहणार आहे. गळीत हंगाम 2025-26 साठी कारखाण्याचे वाहनाचे करार पूर्ण झालेले असून पहिल्या हप्ताचे वाटप चालू झालेले असल्याबाबत माहिती देण्यात आली त्याचबरोबर मागील वर्षी जाहीर केलेल्या दरा प्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले ही अदा केलेली आहेत. यंदाही आमचा कारखाना दराच्या बाबतीत पाठीमागे राहणार नसून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देऊन आम्ही कारखाना चालवणार असून अचूक नियोजन आणि उत्कृष्ट प्रशासन यांची सांगड घालून मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कारखाना जोमाने सुरु होईल आणि गाळप उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वासही चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मारापूरचे सरपंच विनायक यादव, दामाजी कारखान्याचे माजी संचालक विजय माने, भारत निकम, जनरल मॅनेजर सुधीर पाटील, वर्क्स मॅनेजर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट सुनील पाटील, एच आर मॅनेंजर ज्ञानेश्वर बळवंतराव, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, परचेस व सेल मॅनेजर मोहन पवार, चिफ अकौंटंट बजरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, आयटी मॅनेजर निलेश रणदिवे, इलेक्ट्रिक मॅनेजर संजय शिंदे, सहा.सुरक्षा अधिकारी रणजीत पवार, अशोक आसबे, अधिकार व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो..
0 Comments