भाळवणी : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांचे हस्ते आषाढी सोहळयासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालख्यांचे पिराची कुरोली येथे आगमन झाले असता सदर सोहळयातील विठठल भक्तांना कारखान्याचे वतीने शिरा वाटप करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक सर्वश्री परमेश्वर लामकाने, अमोल माने, अरुण नलावडे, विश्वास उपासे, माजी संचालक सर्वश्री राजाराम माने, पांडूरंग कौलगे, संभाजी बागल, माजी पंचायत समिती सदस्य सुरेशबापू देठे, रामचंद्र कौलगे, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख व सेवा करणारे कर्मचारी मोठया संख्येनी उपस्थित होते.
0 Comments