पंढरपूर/प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.
याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे, आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करून मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, अनिल बागल, संजय बंदपट्टे, संतोष कांबळे, दत्ता भोसले, एडवोकेट पराग जागीरदार, पत्रकार अभिराज उबाळे, वीरेंद्र उत्पात यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले की लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकमन घडविण्यासाठी शाहीरीच्या माध्यमातून दिलेले योगदान अमूल्य आहे. तसेच त्यांनी वंचित आणि विस्थापितांच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून मांडल्या. अशा थोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देताना सांगितले की अखिल भारताचे पहिले नेते होते. झुंजार पत्रकार. महात्मा फुले यांनी सुरू केलेला शिवजयंतीचा सोहळा देशभर पोचवणारे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक. विचारवंत. खर्या अर्थाने लोकमान्य!ठरल्याचे उद्गार मनसेनेचे दिलीप धोत्रे यांनी काढले.
0 Comments