LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*☘️श्रावण शुक्ल एकादशी माहात्म्य☘️* *🚩पुत्रदा एकादशी🚩*



    *💢युधिष्ठिराने श्रीकृष्णाला श्रावण शुक्ल एकादशीविषयी विचारले असता तो म्हणाला, “धर्मा! ही एकादशी पुत्रदा नावाने विख्यात आहे. ज्याला इहपरलोकी सौख्य मिळावे अशी इच्छा आहे त्याने या तिथीचे व्रत करावे. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने मनुष्याला वाजपेय यज्ञाचे फल मिळते. संततीचे सुख लाभते. तो पापमुक्त होऊन स्वर्गलोकी जातो. आता हिची पावन कथा सांगतो.*

    *❇️द्वापरयुगाच्या प्रारंभी महिष्मती नगरीत महिजित नावाचा राजा आपल्या प्रजेचे प्रेमाने पालन करीत असे. त्याचा विवाह होऊन पुष्कळ काळ लोटला तरी त्याला संतती झाली नाही. त्याने अनेक उपाय-उपचार केले, पण त्यांचाही उपयोग झाला नाही. उतारवयात त्याला राज्याची फार चिंता वाटू लागली. कशातच सुख वाटेना. शेवटी त्याने प्रजाजनांची सभा बोलावली व म्हणाला, “लोक हो ! मी कधीही पापाचरण, अन्याय, ब्राह्मणांची नाडणूक अशी दुष्कर्मे केली नाहीत. नेहमी स्वधर्माला अनुसरूनच वागलो. तुम्हा सर्वांचे हित केले. असे असतानाही मला संतानप्राप्ती झाली नाही. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा.' तेव्हा उपाध्यायासह अनेक श्रेष्ठ ब्राह्मण - राजाला संतती व्हावी म्हणून - तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात गेले. तेथे लोमश ऋषींची भेट झाली. विप्रांनी त्यांना नमस्कार केला व राजाची चिंता कथन करून त्याला संतती होण्यासाठी - उपाय विचारला.* 

    *✴️ते म्हणाले, “विप्रांनो ! महिजित पूर्वजन्मी वाणी होता. तो व्यापारासाठी गावोगाव हिंडत असे. एकदा ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला भर दुपारी तहानेने व्याकूळ होऊन तो एका ग्रामसीमेपाशी आला. तेथील झऱ्याकडे पाणी पिण्यासाठी गेला. तेवढ्यात नुकतीच व्यालेली एक गाय आपल्या वासरासह तेथे आली. ती उन्हाने तापली होती व तहानेने कासावीस झाली होती. पण त्याने तिला हाकलून दिली व ते पाणी स्वतःच प्यायला. त्या दुष्कर्मामुळे या जन्मी तो संततिहीन झाला आहे. आता उपाय ऐका. श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही सर्व प्रजाजनांनी भजन, पूजन, उपोषण व जागरण करा. द्वादशीला विष्णुपूजन करून तुम्हां सर्वांचे एकत्रित पुण्य राजाला अर्पण करा. त्यामुळे त्याला अपत्यप्राप्ती होईल.” ते ऐकून सर्वांना आनंद झाला. त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले. त्या पुण्यप्रभावाने राणी गर्भवती झाली. तिने पुत्राला जन्म दिला."🚩🙏*
--------------------------------__________
-----------------------------_____________
*https://www.facebook.com/bhatusonar32/*
*https://www.youtube.com/@bhatusonar3833*
*instagarm.com/shree_sant_sakharam_maharaj_*
*https://t.me/+inaH4xvrUHs5ZjJl*
 
 *_🚩🚩 रामकृष्ण हरी 🚩🚩_*
 *😍 व्हाट्सएप ग्रुप 😍*
 *_‼️श्रीसखाप्रसाद संदेश‼️_*
 *_‼️श्रीगरुप्रसाद‼️_*
 *_‼️श्रीगुरुमाऊली प्रसाद‼️_*
 *_‼️श्री संत सखाराम महाराज‼️_*
 *_‼️गोविंद हरि सखाराम‼️_*
 *_‼️ॐ नमः सखारामाय‼️_*
 *_‼️श्री सद्गुरू सखाराम माऊली ६ ते २२‼️_*
 *_९६६५२९०९३७_*
-------------------------------___________
--------------------------_______________

Post a Comment

0 Comments