पंढरपूर, येथील लोक शाहिर आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शहरातील विविध भागातून काल रोजी शहरातील विविध मंडळांनी विविध भागातून मिरवणुका काढल्या होत्या. शहरातील विविध भागातून आलेल्या मंडळाचा अध्यक्ष चा सत्कार व मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले
हा सन्मान सोहळा लोक शाहिर आण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठान वतीने करण्यात आला
हा सन्मान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात केला. या वेळी लोक शाहिर आण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अभिजित कांबळे, उप अध्यक्ष सुदेश खिलारे, प्रथमेश साठे, दादा वाघमारे, बापू खिलारे, आण्णा धोत्रे, संतोष वाघमारे, आकाश लोंढे, राकेश वाघमारे, अमोल वाघमारे, गुंडू खिलारे, दत्ता लोंढे, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
या वेळी शहर पोलिसांनी उत्तम प्रकारे चोख बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमात शहर पोलिस अधिकारी यांचाही सत्कार लोक शाहिर आण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला.
0 Comments