LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वंचिताचा आवाज...माऊली हळणवर प्रतिनिधी.पंढरपूर समाजातील बेदखल वंचितांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले वंचिताचे नेते माऊली भाऊ हळणवर यांनी आजपालकमंत्री ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या सुचनेनुसार पंढरपूर नगरपालिकेत जाऊन निवेदन देत पाठपुरावा सुरू केला आहे


पंढरपूर नगरपालिकेत तृतीयपंथी बांधवांना शासकीय जागा व हक्काचे घर मिळावे म्हणून निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले कारण या तृतीयपंथी बांधवांना भाड्याने कोणी घर देत नाही घरातून घरची मंडळी मदत करत नाहीत उलट तिरस्कार करतात सदर लोक आपले पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर व बाजारात मागून मिळेल त्यावर उपजीविका करतात राहावयास घर च नसल्याने ते आपल्या गुरु च्या घरी छोट्याशा खोलीत दहा ते पंधरा जण एकत्र राहून अत्यंत हिन दर्जाचे  जीवन जगत असतात परवा पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर येथे आले असता या सर्व तृतीयपंथी बांधवांनी माऊली भाऊ हळणवर यांना सोबत घेऊन पालकमंत्र्याकडे आपली व्यथा मांडली होती त्यावेळी पालकमंत्री महोदयांनी माऊली भाऊ यांना सांगितले की नगरपालिकेकडे यांच्या सर्वांचे मागणी अर्ज द्या बाकीचे मी स्वतः लक्ष घालून यांना जागा व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून आज नगरपालिकेत जाऊन या सर्व तृतीय पंथी बांधवांचे वैयक्तिक अर्ज दाखल केले लवकरच यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत पालकमंत्री महोदय एक बैठक लावून या वंचित समूहाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून पंढरपुरात यांना जागा व घर मिळवून देणार असल्याची माहिती माऊली भाऊ हळणवर यांनी दिली
यावेळी सोबत आरपीआयचे राज्य संघटक दीपक चंदनशिवे माजी नगरसेवक राजु सर्वगोड,आमोल डोके मेंबर यांचे सह सोमनाथ ढोणे प्रसाद कोळेकर प्रवीण सलगर यांचे सह  तृतीयपंथी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments