LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन



नागपूर, दि. १० ऑगस्ट — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. नागपूर येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे जवळपास १२ तासांचे अंतर अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. नागपूर(अजनी) ते पुणे दरम्यान ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवर थांबणार असून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्यात पोहोचणार आहे.

ही गाडी सध्या नगर-दौंड मार्गे पुण्याला पोहोचते, ज्यामुळे प्रवासात १०० ते १२५ किमीचा अतिरिक्त फेरा पडतो. त्यामुळे नगर ते पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला देण्यात आली आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही कमी होण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे हा महत्त्वाचा औद्योगिक पट्टा असून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या नवीन मार्गांची आवश्यकता आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन एक्सप्रेस वे तयार केला जाणार असून, या मार्गाच्या ‘राईट ऑफ वे’मध्ये रेल्वे मार्ग समाविष्ट केल्यास प्रवास आणखी सुलभ आणि जलद होईल.

देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी म्हणून नागपूर-पुणे वंदे भारत गाडीची ओळख निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments