पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा सण यंदा एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ‘पर्यावरणपूरक राखी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी निसर्गसंवर्धनाचा संदेश देत परंपरेला एक नवीन रूप दिले.
विद्यार्थ्यांनी कागद, कापड, नैसर्गिक धागे, सुकलेली फुले, बीया अशा पर्यावरणास हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर करून स्वतःच्या हस्तकलेतून सुंदर राख्या तयार केल्या. या राख्यांमध्ये केवळ सौंदर्यच नव्हे, तर पर्यावरणाची काळजी आणि प्रेमाचा भाव दाटून दिसत होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापिका राजश्री घंटी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे समाजसेवक श्री.मुजम्मील कमलीवाले उपस्थित होते.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री घंटी यांनी समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना राखी बांधली. श्री कमलीवाले यांनी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन च्या शुभेच्या दिल्या व शाळेतील नवीन उपक्रमाने भरभरुन कौतूक केले.
श्री.मुजम्मील कमलीवाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "राखी हे फक्त भावाबहिणीचे नाते जपणारे प्रतीक नाही, तर आपल्याला पृथ्वीमातेचेही रक्षण करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे."विद्यार्थ्यांनी राखीच्या महत्त्वावर आधारित गाणी, कविता सादर केल्या. बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधताच, भावाने तिला झाड लावण्याचे व झाडांची काळजी घेण्याचे वचन दिले. हा प्रसंग पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.
रक्षाबंधन या कार्यक्रमासाठी पहिली ते पाचवी सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. हा कार्यक्रम उत्तमरित्या होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश पुरंदरे सदस्या लीलाताई जोशी,रेखा उंबरकर ,डॉ. अनिल जोशी, ॲड ज्ञानेश्वर आराध्ये,श्री प्रशांत परिचारक , रेखा भालेराव, प्रशांत कुलकर्णी, डॉ तेजस भोपटकर, प्रसाद संत सर यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments