पंढरपूर(प्रतिनिधी)- शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने पंढरपूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांच्याकडे तीर्थक्षेत्र पंढरपूर मधून 1) तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र अयोध्या, 2) तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी, 3) तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र वाराणसी या तिन्ही ठिकाणी आठवड्यातून एकदा रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी श्री बाबा हरी मठाचे महंत श्री विठ्ठलगिरी महाराज, श्री चौरंगीनाथ मठाचे विश्वस्त श्री योगी रवीनाथ महाराज, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेवक गणेश भिंगारे मेंबर, नागेश लिगाडे, माऊली कोळी, विशाल डोंगरे आदी उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र अयोध्या, तिरुपती बालाजी, वाराणसी रेल्वे गाडी सुरू करावी अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून भाविक भक्त व वारकरी करीत होते याची दखल घेत पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली.
या तिन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने, रेल्वेची सोय झाल्यास प्रवासाला सुलभता येईल.
त्याच बरोबर या तिन्ही ठिकाणांना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूर, तीर्थक्षेत्र अयोध्या, तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी, तीर्थक्षेत्र वाराणसी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. रेल्वेची सोय झाल्यास, त्यांना सोयीस्करपणे प्रवास करता येईल. आणि चार ही तीर्थक्षेत्र जोडली जातील, रेल्वेमुळे या भागामध्ये आर्थिक विकासही होईल.
पंढरपूर हे भारताची दक्षिण काशी तसेच महाराष्ट्र व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. अयोध्या हे श्री प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान आहे. वाराणसी हे शिव-शक्तीचे स्थान असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक काशी विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. तिरुपती बालाजी हे विष्णूचे मंदिर आहे. या चारही तीर्थक्षेत्रांना रेल्वेने जोडल्यास, भाविकांची सोय होईल आणि या भागांमध्ये पर्यटनालाही चालना मिळेल. यामुळे या तीन तीर्थक्षेत्रांना पंढरपूर मधून आठवड्यातून एकदा रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
------------------------------------------------------------
सदरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक व मासिक यामध्ये घेण्यात यावी अशी संपादक, वृत्तसंपादक, प्रतिनिधी, पत्रकार यांना नम्र विनंती विनंती...!
तसेच सदरील बातमी ही आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला घेण्यात यावी अशी संपादक, वृत्तसंपादक, प्रतिनिधी, पत्रकार यांना नम्र विनंती विनंती...!
श्रीनिवास राजाराम उपळकर
पंढरपूर शहर प्रमुख,
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना
मो- 7385850910
0 Comments