सोलापूर – प्रभाग क्रमांक २५ नवोदय नगर, मजरेवाडी, होटगी रोड परिसरात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणितीताई शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांचा संवाद साधला.
यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या की, "महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे सोलापुरातील नागरिकांना या पावसाळ्यात अतिशय गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व पायाभूत सुविधा दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असूनही ती योग्यप्रकारे पार पाडली गेली नाही. यामुळे आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे."
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, "मी आमदार असताना हा भाग माझ्या मतदारसंघात येत नव्हता; मात्र आज मी खासदार म्हणून तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून, महापालिका प्रशासनाची तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय करून घेणार आहे."
नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, सांडपाणी व नालेसफाईच्या समस्या, रस्त्यावरील खड्डे तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्न खासदारांसमोर मांडले. खासदार शिंदे यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीप्रसंगी सोलापूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खंदारे, राजेंद्र सरडे, राजकुमार बिराजदार, नेवरे सर, झेडगे सर, संजय कांबळे, भराडे गुजा, दिनेश पाटील, शेखर बिराजदार, गजेंद्र गडकर, पंकज बरनपुरे, कोकणे किरण, अमित शहा, हर्षवर्धन शहा, रीयंका सरडे, बंडगर मॅडम, बरमपुर मॅडम, शेटे, भाग्यश्री सरडे, वैशाली शेटे मॅडम, राठोड मॅडम, मगर, क्षीरसागर, कांबळे मॅडम, भराडे शोभा बिराजदार, वैजयंती बिराजदार, कोळीगीरी, कंडरे मॅडम, सोनाली होसमणी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments