LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात रस्यावरच्या खड्ड्यात पेटवल्या मेणबत्त्या, महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन

 

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर शहरातील विविध भागातील चौकाचौकात, विविध मार्गांवर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिक व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. याचाच निषेध म्हणून पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे वतीने रस्त्यांवरील खड्ड्यात मेणबत्त्या लाऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, पंंढरपूर शहरातील रस्त्यांची चाळण झालीय, ऐन पावसाळ्यात भाविकांना व नागरिकांना याचा खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पंंढरपूर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम खाते आदी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.  त्यामुळे पडलेले हे खड्डे भाविकांना दिसावेत व हा ज्वलंत प्रश्न प्रशासकीय अधिकारी यांनाही कळावा म्हणून आम्ही आज या खड्ड्यात मेणबत्त्या पेटवून लावल्यात. जर तातडीने हा प्रश्न सोडला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

हे खड्डे बुजवले च पाहिजे ! अशा जोरदार घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.
................

मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
 आपला 
 गणेश अंकुशराव 
मोबाईल: +91 93702 71730

Post a Comment

0 Comments