सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील पुळुज व विटे गावांना भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाला कोणतीही अट न लावता सरसकट पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
या पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, राजाभाऊ बाबर, माणिक बाबर, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, नितीन शिंदे, पांडुरंग ताटे, अरुण पाटील, पंकज गावडे, दत्तात्रय पांढरे, विक्रम पुजारी, अण्णासाहेब पुजारी, महादेव शिंदे, रमेश बाबर यांच्यासह पुळुज व विटे येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments