गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतपिके पाण्यात गेल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिरगाव, एकलासपूर व अनवली या गावांतील बाधित शेतकरी व नागरिकांची आमदार श्री समाधानदादा आवताडे साहेब यांनी भेट घेऊन त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी तहसीलदार सचिन लंगोटे, गट विकास अधिकारी सुशील संसारे, कृषी अधिकारी मोरे साहेब, श्री विजयसिंह दादा देशमुख, श्री संभाजी पाटील, श्री आदिनाथ शिंदे,दादा घाडगे,दादा कवडे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments