LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*न्यु सातारा बीसीए कॉलेजमध्ये रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न*.



पंढरपूर प्रतिनिधी:  
                          न्यु सातारा समूह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ बीसीए कोर्टी-पंढरपूर येथे बीसीए भाग १,२ व ३ मधील विद्यार्थ्यांकरिता पुणे येथील प्रो-अझुर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ श्री.बापू अरकस व त्यांचे सहकारी यांनी मिळून पाच दिवसाचे     रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ट्रेनिंग शिबीर आयोजित केले होते.सदर ट्रेनिंग हे दिनांक अठरा सप्टेंबर ते दिनांक बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आले.   
                          प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सर्व मांन्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रो-अझुर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ श्री.बापू अरकस,संस्थेचे संस्था प्रतिनिधी श्री शेडगे डी.डी. ,न्यु सातारा बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तंटक एन.एन., न्यु सातारा बीसीए महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा.ताठे पी. बी., न्यु सातारा डिप्लोमा कॉलेजचे उप-प्राचार्य प्रा.बाड व्ही.एन., विभागप्रमुख प्रा. कुलकर्णी बी .पी.,   अकॅडमीक को-ऑर्डिनेटर प्रा. गोडसे यु. आर. व सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यु सातारा बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तंटक एन.एन. हे होते.यावेळी उप-प्राचार्य प्रा. ताठे पी.बी. यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आजच्या युगात AI चे वाढते महत्त्व आणी  दैनंदिन कामकाजामध्ये होणारा AI तंत्रज्ञानाचा वापर याचे महत्व अधोरेखित केले. सदर शिबिराचा आयोजनाचा प्रमुख उद्देश हा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच बाहेरील नवनवीन क्षेत्र व त्यामधील संधी याची माहिती होण्याच्या दृष्टीकोनातून व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सदर प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले व भविष्यात देखील महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनकरीता ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. 
                                 प्रशिक्षणादरम्यान श्री.बापू अरकस व त्यांचे सहकारी यांनी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन म्हणजे काय ? व त्याचे महत्त्व या विषयाने प्रशिक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर विविध आरपीए टूल्स व त्याचे महत्त्व विशद केले. विविध आरपीए टूल्स मधून युआय पाथ स्टुडीओ (Ui path studio) द्वारे त्यांनी प्रोग्रॅम कशा पद्धतीने ऑटोमेशन द्वारे केले जातात, त्याचे प्रॅक्टिकल द्वारे प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थ्यांना विविध टास्कद्वारे युआय पाथ टूल्स  (Ui path Tool)  वापरण्याचे प्रशिक्षण दिले. 
                                 सदर प्रशिक्षणानंतर काही निवडक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आला, यामध्ये विद्यार्थ्यांनी सदर प्रशिक्षणामध्ये स्वतः वेगवेगळ्या टास्कद्वारे विविध AI Tools वापरून आपले दैनंदिन प्रोग्राम्स कशाप्रकारे सोपे केले जातात याचा प्रात्यक्षिक द्वारे अनुभव आला असे सांगितले. तसेच बीसीए  नंतर AI  क्षेत्रामध्ये असणाऱ्या नवनवीन संधींचा प्रत्यक्ष टूल्स वापरून अनुभव घेतला. 
                                 प्रशिक्षण शिबिराच्या समारोपा प्रसंगी मान्यवराच्या हस्ते ट्रेनिंग प्रोग्राम पुर्ण केल्याबद्दल विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री. बापू अरकस , संस्था प्रतिनिधी मा. शेडगे डी. डी, न्यु सातारा बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तंटक एन. एन, न्यु सातारा बीसीए महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा.ताठे पी.बी, न्यु सातारा डिप्लोमा कॉलेजचे उप-प्राचार्य प्रा.बाड व्ही.एन.,विभाग प्रमुख प्रा.कुलकर्णी बी. पी, अकॅडमीक  को-ऑर्डिनेटर प्रा.गोडसे यु.आर. ,प्रा. पाटोळे व्ही.एस, प्रा. मुजावर एस.एस, प्रा. काळे एस. एस, श्री. शिंदे एस. एम, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 
                                  ट्रेनिंग प्रोग्रामच्या समारोप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन न्यु सातारा बीसीए महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा.ताठे पी.बी. यांनी केले.शिबिराच्या आयोजनाकरिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजाराम (नाना) महादेव निकम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या राबविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कोतूक केले.

Post a Comment

0 Comments