पंढरपूर/ प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने भाजपा प्रणित परिचारक गटाची गेली चार दशकाची सत्ता उलथवून लावत ऐतिहासिक विजय मिळवत नगराध्यक्षसह प्रभाग क्रमांक १७ मधून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांचा विक्रमी मताने विजय संपादन केल्यानंतर मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट घेतली.
याप्रसंगी राजसाहेब ठाकरे यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपा प्रणित परिचारक आघाडी विरुद्ध सर्वपक्षीय तीर्थक्षेत्र विकास आघाडी मध्ये प्रमुख लढत झाली होती.
यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह मनसेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला येथील नागरिकांनी विक्रमी मतांनी निवडून दिले.
या निवडणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने पंढरपूर नगरपालिकेत गेली ४० वर्षानंतर सत्तांतर झाले असून पंढरपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद अधिकच वाढली आहे.
या यशानंतर नुकतीच मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुंबई येथे राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
याप्रसंगी राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत धोत्रे यांच्याशी चर्चा करून आगामी काळात पंढरपूर येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.
पंढरपुरात मनसेने मिळवलेल्या यशाबाबत राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून दिलीप धोत्रे यांचे कौतुक होत आहे.

0 Comments