पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळूवर केली कारवाई 29 डिसेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने शेगाव दुमला येथील नदीकिनारी अवैधरित्या वाळू उपसा करून वाळू चोरून ट्रॅक्टर मध्ये वाळू चोरून जात असताना पाठलागकरून ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतलेले आहे सदर ट्रॅक्टर चा क्रमांक एम एच 13 एच एम 33 35 असा आहे सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू एकूण ट्रॅक्टर ट्रॉली सहा व वाळूची किंमत सात लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून अवैध वाळू चोरी प्रकरणी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर चालक आणि मालक समाधान आप्पासाहेब जगताप राहणार शेगाव दुमला यांच्याविरुद्ध
भारतीय न्याय संहिता कलम 303 305 अन्वये पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब
माननीय
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर एपीआय शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोडले ASI आबासाहेब शेंडगे सुधाकर हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ चालक पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाफ यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे

0 Comments