प्रतिनिधी-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आ. समाधान आवताडे यांनी सभागृहात कर्मचारी हिताची भूमिका मांडून संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना वाचा फोडली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. आवताडे यांनी प्रश्नउत्तराच्या तासाला खालील मागण्या केल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब, तसेच प्रलंबित वेतन, थकित पगार आणि इतर मान्य मागण्यांवरील कार्यवाही संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित त्यांनी करून सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात मांडलेले मुद्दे -१० वर्षे सेवा पूर्ण असलेल्या NHM (National Health Mission) कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत 4 नोव्हेंबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे का? विलंबाचे कारण काय?, सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?, विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी, लॉयल्टी बोनस आदी लाभांची अंमलबजावणी कोणत्या कालावधीत होणार? कर्मचारी अजूनही वंचित का?, न मान्य झालेल्या मागण्यांवर नेमलेल्या समितीची काय प्रगती आहे? त्यावर निर्णयासाठी शासनाने कोणती कालमर्यादा निश्चित केली आहे? अशा विविध मागण्यां संदर्भात त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
विधानसभा सभागृहात आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या या मागण्यांवर उत्तरो दखल शासनाची भूमिका व्यक्त करताना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन पूर्णपणे संवेदनशील असून त्यांनी आरोग्य खात्यात आतापर्यंत केलेल्या समर्पक भावनेच्या सेवेचा शासनाला कोणत्याही प्रकारे विसर पडला नसून त्यांच्या सर्व मागण्यांवर संपूर्ण सरकार हे सकारात्मक असून अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या या प्रश्नांवर तसेच मागण्यांवर शासन योग्य आणि आवश्यक ती पावले उचलून या सर्व कर्मचाऱ्यांना अपेक्षित न्याय देईल असे सांगितले आहे. त्या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी संबंधित खाते अंतर्गत व शासन व्यवस्थेमार्फत आवश्यक बैठकी झाली असून त्या बैठकीवर कार्यवाही करण्याच्या दिशेने शासन लवकरच सकारात्मक भूमिका स्पष्ट करेल आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याच्यासाठी नेहमीच कटिबद्ध असेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी दिला आहे.
कोट-आरोग्यमंत्री मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिलेले उत्तर अतिशय समर्पक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत करणारे असून यावर संबंधित खात्याने तसेच शासकीय आरोग्य व्यवस्थेने योग्य त्या दिशेने या कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांच्या पदरात अपेक्षित फळ देण्यासाठी राज्य सरकार राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री हे वचनबद्ध असल्याचे आजच्या या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे-आ समाधान आवताडे.

0 Comments