LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीमध्ये मंगळवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उदघाटनदिल्ली येथील मान्यवरांची उपस्थिती राहणार


पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये उद्या (मंगळवार) दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) चे उदघाटन होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. 
         मंगळवार, दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:१५ वाजता स्वेरी कॅम्पस मध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) चे उदघाटन होणार आहे. यासाठी अटल इनोव्हेशन मिशन कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख, अटल इनोव्हेशन मिशनचे नावीन्यपूर्ण उपक्रम प्रमुख वितस्ता तिवारी तसेच व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे महेश वैद्य आणि सौ. सुजाता नरसिंहन हया देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे असणार आहेत तर सोबस इनसाईट फोरमचे दिग्विजय चौधरी, अटल इनोव्हेशन मिशनचे दीपाक्षी जिंदाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरचे केंद्र हे अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), निती आयोग, भारत सरकार समर्थित आहे. तरी या अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा व विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा संशोधन आणि विकासाचा एक भाग आहे. यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हर्षवर्धन रोंगे हे काम पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments