प्रतिनिधी/-
जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती माढा, कुर्डुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांची सविस्तर आढावा बैठक सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह, माढा येथे पार पडली.
या बैठकीस जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, महिला व बालविकास (ICDS), आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, कृषी विभाग, लघुपाटबंधारे, महावितरण, उमेद अभियान, मनरेगा (MREGS), घरकुल विभाग आदी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले की, निराधार योजनांतील प्रलंबित प्रकरणांबाबत सर्व अधिकारी व तलाठ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही अडचण असल्यास संबंधितांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, अथवा अडचण कायम राहिल्यास आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या गावांमध्ये डबल चार्ज तलाठी आहेत, त्या ठिकाणी कार्यालयाबाहेर स्पष्ट फलक लावून उपस्थितीचा वार व रजेचे कारण नमूद करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या.
सीना–माढा उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानास १ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती देत, या योजनेची अंमलबजावणी तळागाळापर्यंत प्रभावीपणे होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले.
शिक्षण विभागा अंतर्गत पोषण आहारातील त्रुटी त्वरित दूर कराव्यात, मोफत पाठ्यपुस्तके अर्धवट मिळालेल्या शाळांचा अहवाल सादर करावा, तसेच घनकचरा व्यवस्थापन बाबत पूर्ण कामाची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीच्या आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सर्व विभागांनी लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने जबाबदारीने काम करून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवाव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले.
तहसीलदार, गटविकास अधिकारी, माढा नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सीना माढा सिंचनचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मा.जि.प.सदस्य भारतआबा शिंदे, शहाजी अण्णा साठे, नितीन कापसे, प्रमोद कुटे, विजयसिंह पाटील, भजनदास खटके, आबा साठे, भैय्या खरात, संतोष मुटकुळे, अभिजीत उबाळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments