LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरी मधील शिस्त, बनवी करिअर मस्त! -पालक प्रतिनिधी सतीश दिक्षित


स्वेरीज् डी. फार्मसीमध्ये ‘पालक मेळावा’ संपन्न
पंढरपूर– ‘स्वेरी या नावातच एक विश्वास निर्माण झाला आहे. स्वेरी शिक्षण क्षेत्रात कोणत्याही बाबतीत कमी पडत नसल्याचे नेहमीच दिसून येते. त्यामुळे आज स्वेरीचे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते. स्वेरीच्या नियोजनामुळे पालकांच्या मनात निश्चिंतता दिसून येते. वसतिगृह असो, वा वर्गातील शिक्षण असो विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी स्वेरीतील प्राध्यापकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. एकूणच ‘स्वेरीतील शिस्त म्हणजे विद्यार्थ्यांचे करिअर मस्त झालेच म्हणून समजा.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी सतीश दिक्षित यांनी केले.
         स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा फार्मसीमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्ष फार्मसीतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘पालक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून पालक प्रतिनिधी सतीश दिक्षित हे मार्गदर्शन करत होते. पालक प्रतिनिधी म्हणून अतुल मोरे तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून शुभांगी जाधव ह्या उपस्थित होत्या. प्रास्तविकात प्रा. सौरभ कौलगी यांनी डी.फार्मसीची माहिती दिली. यामध्ये महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, रात्र अभ्यासिका वर्ग, तसेच शिक्षणासाठी संबंधित महत्वाच्या बाबी सांगितल्या. सोलार रुफटॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस सुविधा, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसी निगडीत आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती दिली. पालक प्रतिनिधी अतुल मोरे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे काटेकोर नियोजन करून सातत्य जपले तर यश मिळणारच आणि एखाद्याच्या वाट्याला अपयश आल्यास बिलकुल खचून न जाता अधिक जोमाने अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास सहज यश शक्य होते.’ तर शुभांगी जाधव यांनी स्वेरीतून मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कॉलेज कडून होणाऱ्या संवादाचे कौतुक आणि समाधान व्यक्त केले. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पालक या मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकांनी विविध विषयावर प्रश्न मांडले. यावेळी प्रा. कौलगी यांनी जागेवरच त्या प्रश्नांची उत्तरे दिली तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी जवळपास २०० पालक उपस्थित होते. प्रा. ईशा शेटे व रेश्मा जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.नितल दांडगे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments