नवी दिल्ली, दि. ११ मार्च २०२६ : माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments