LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*केंद्र सरकारने अचानक केलेली गॅस दरवाढ मागे घेण्याबाबत पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन*


केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानक वाढ करून महागाईत उरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपये तर व्यवसाय गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपये केलेली दरवाढ रद्द करण्यात करावी. अशी मागणी करण्यात आली.
आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे गॅस सिलेंडर साठी रांगाच्या रांगा लावाव्या लागत आहेत.परंतु सध्या गॅसचा तुटवडा नाही हा सरकारचा दावा चुकीचा असून दरवाढी सोबत गॅस बुकिंगचा कालावधी पण वाढविला आहे.गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यवसायांना गॅस उपलब्ध होत नाही.गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद होत आहेत.आधीच महागाई त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून सरकारने दरवाढ तत्काळ मागे घ्यावी तसेच एलपीजी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करून ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत. 
या मागणीसाठी पंढरपूर  शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री संदीप पाटील, शहराध्यक्ष श्री आदित्य फत्तेपूरकर ,शेकापचे नेते डॉ अनिकेत देशमुख, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे, विकास नागटिळक,विलास रोंगे, संतोष गोंजारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments