LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार* *आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून ना.राधाकृष्ण विखे-पाटील फोनवरून संपर्क करून अधिकाऱ्यांना दिले आदेश*



प्रतिनिधी/- 

सध्या काही लोक अफवा पसरवून, शेतकऱ्यांना वेटीस धरत असल्याचे दिसत आहेत, तरी कोणीही कोणत्याही भूलथापांना किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत टेल टू हेड पाणी पोचेपर्यंत आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानभवनात भेट घेऊन सीना -माढा उपसा सिंचन योजना बंद न करण्याबाबतचे पत्र दिले असता, योजनेवर मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी थकीत असली तरी हि योजना परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असल्याचे सांगितले.

हि योजना बंद झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर याची तात्काळ दखल घेत विखे-पाटील साहेबांनी लगेचच फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना योजना सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले.

या योजनेतून टेल टू हेड शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत सुरळीत चालणार असल्याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घेण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments