LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*मौजे गोपाळपूर येथील महिलेच्या घरातील चोरीच्या गुन्ह्यात पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण १८ लाख रुपये किमतीचे मुद्देमान त्यामध्ये १२ तोळे सोने, तीन लाख ७८ हजार रुपये रोख रक्कम व ३०० ग्रॅम चांदी, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला*



पंढरपुर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३००/२०२६ बी एन एस कलम ३०५ (ई), ३(५) प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गोपाळपूर येथील राहणारी फिर्यादी महिला नामे नंदाबाई नामदेव भुई वय ५० वर्षे, व्यवसाय-मासे विक्री रा. मातोश्री आश्रमाच्या समोर गोपाळपुर ता पंढरपुर जि. सोलापूर ह्या त्यांच्या राहत्या घरी थांबले असता त्यांना एक महिला घराचे समोर येवुन नवीन घर कमी किंमतीमध्ये विकत घेवुन देते. अशी माहिती देवुन फिर्यादी महिलेस बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले. सदर गोष्टीचा फायदा घेवुन त्या महिले सोबत असलेल्या इतर तिन महिला व एक पुरुष असे फिर्यादीचे घरात जावुन घरातील एकूण बारा तोळे सोने तीनशे ग्रॅम चांदी तीन लाख ७८ रुपये रोख रक्कम एक विवो कंपनीचा मोबाईल बँक पासबुक व एफ डी कार्ड असा ऐवज पिशवीमध्ये घालून चोरून नेला होता नंतर फिर्यादी महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे येऊन घडले प्रकाराबाबत सर्व हकिकत सांगितले त्यावरून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ३००/२०२६ बी एन एस कलम ३०५ (ई), ३(५) प्रमाणे असे एकूण चार महिला व एक अज्ञात पुरुष यांचे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर फिर्यादी महिलेने आरोपींचे मोडस बाबत दिलेल्या वर्णनावरून पंढरपूर तालुका पोलिसांनी मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रशांत डग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यातील फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयीत दोन महिलांना गोपाळपूर गावातुन ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सदर महिलांची सखोल चौकशी केली असता सदर महिलांच्या घरामध्ये सुरुवातीला फिर्यादीचे सोने-चांदीच्या दागिन्याबरोबर चोरलेले बैंक पासबुक व एफ डी कार्ड मिळाले त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासाला पुढील दिशा मिळाली त्यावरून सदर आरोपी महिलांकडे सखोल चौकशी करून विचारपूस केली असता. महिलांनी सदरचे सोने, रोख रक्कम मोबाईल फोन सॅमसंग कंपनीचा व चांदी असा एकूण १८ लाख रुपये किमंतीच मुद्देमाल चोरल्याचे कबूल केल्यानंतर सदरचा मुद्देमाल सदर महिलांकडून पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन पंचांच्या समक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केलेला असून पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर गुन्ह्यातील एकूण १८ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल त्यामध्ये ०३ लाख ७८ हजार रुपये रोख

रक्कम्, १२ तोळे सोने तसेच ३०० ग्रॅम चांदी, सॅमसंग कंपनीचा मोबाईल व फिर्यादीचे अर्बन बँकेचे पासबुक व एफ.डी कार्ड असा मुददेमाल १०० टक्के रिकव्हर केला आहे. सदरचा चोरीचा गुन्हा पंढरपूर तालुका पोलिसांनी बारा तासांमध्ये उघडकिस आणलेला आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये चार महिला व एक पुरुष असे एकुण पाच आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. पैकी तीन महिला आरोपींना ताब्यात घेवुन इतर दोन आरोपीबाबत तपास सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोो यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अप्पर पोलीस अधीक्षक, श्री प्रीतम यावलकर सोो, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे सारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सपोनि अक्षय सोनवणे, सपोनि शहाजी गोसावी, महिला सपोनि श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम, पोसई विक्रम वडणे, पोसई भारत भोसले, पोसई दत्तात्रय तोंडले, पोहेकॉ सचिन आटपाडकर, प्रमोद साळुंखे, बाजीराव काकडे, सागर गवळी, मंगेश रोकडे, सज्जन भोसले, स्वप्निल वाडदेकर, विजयकुमार आवटी, मपोहेकॉ सुवर्णा कदम, चालक पोकॉ हसन नदाफ क गोडसे यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे

Post a Comment

0 Comments