पंढरपूर, येथील बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांचा सन्मान, सत्कार हरी भत्क परायण मा देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य,आठवा वर्धापन दिनानिमित्त शिवस्वराज्य पंढरी रत्न पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात पंढरपूर येथील बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांना श्री देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. या सोहळ्यात पंढरपूर चे नगराध्यक्ष डॉ प्रणिती भालके, रामभाऊ गायकवाड,उपळकर , आदी मान्यवर उपस्थित होते. भाई किशोर भोसले समाजाच्या हितासाठी झटणारे, बहुजनांच्या चळवळीत सहभागी होऊन बाजू मांडताना दिसतात.बहुजनांचा बुलंद आवाज सतत समाजासाठी कार्यरत असून या कार्याची दखल घेऊन शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या साली शिवस्वराज्य पंढरी रत्न बारा बलुतेदार समाज रत्न देऊन भाई किशोर भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिव स्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील हे आहेत. भाई किशोर भोसले यांचा सत्कार झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments