दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगर येथे *गु. र. नं. २३८/२०२६* अंतर्गत घडलेली घटना ही अत्यंत गंभीर, संतापजनक व लोकशाही मूल्यांना धक्का देणारी आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाकडूनच सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना अमानवीय वागणूक देण्यात आली, त्यांना शारीरिक मारहाण करण्यात आली तसेच मानसिक छळ करण्यात आला, ही बाब अत्यंत निषेधार्थ आज भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात तपास अधिकारी *गणेश देशमुख* तसेच डीबी पथकातील त्यांच्या *सर्व सहकाऱ्यांनी* अधिकारांचा उघडपणे गैरवापर करत निष्पाप सुवर्णकार बांधवांवर *अन्यायकारक दबाव टाकणे, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ व गंभीर धमक्या देणे* अदी प्रकार केल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे म्हणले असून
महाराष्ट्र शासनाच्या लागू असलेल्या *जीआरचे*( G.R ) सरळ उल्लंघन करून कोणतीही कायदेशीर नोटीस अथवा पूर्वसूचना न देता संबंधित सराफाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आले, त्याला अमानुष पद्धतीने वेटीस धरून व मारहाण करत मुलाकडून सोने ‘रिकव्हरी’ देण्यास भाग पाडण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे
. तसेच या संपूर्ण बेकायदेशीर कृतीला कायदेशीर ठरवण्यासाठी खोटी व बनावट प्रक्रिया उभी करून कायद्याचा उघडपणे दुरुपयोग करण्यात आल्याचे म्हटले आहे
हा प्रकार केवळ *व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग करणारा नसून, संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणारा असल्याचे तसेच
पोलीस प्रशासनाने कायदा पायदळी तुडवत सरळ गळचेपी करण्याचा प्रयत्न केला असून, हे कृत्य *अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे.*
त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी *विशेष तपास पथक (SIT)* नेमून पीएसआय गणेश देशमुख व त्यांच्या संपूर्ण डीबी टीमविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत,
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती ही राज्यभर कार्यरत असलेली संघटना असून, सराफ सुवर्णकारांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे.
मात्र, या घटनेमुळे सुवर्णकार समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, प्रशासनाकडून होत असलेली अन्यायकारक वागणूक सहन केली जाणार नाही, ही भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडत आहोत.
आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
*१) संबंधित सर्व पीडितांचे तात्काळ वैद्यकीय परीक्षण करण्यात यावे*.
*२)तपास अधिकारी गणेश देशमुख व संबंधित डीबी पथकावर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी तातडीने सुरू करून चार दिवसांच्या आत पूर्ण करण्यात यावी.*
*३)चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.*
*४)दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावे.*
आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून
आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या भावना तातडीने वरिष्ठ अधिकारीयांचे पर्यंत पोहचवाव्या व सुवर्णकार समाजाला न्याय मिळवून द्यावा, आशी अपेक्षा करत
अन्यथा,
भारतीय नरहरी सेना सराफ सुवर्णकार संरक्षण समिती राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, उपोषण व इतर संविधानिक मार्गांचा अवलंब करतील.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस व प्रशासनावर राहील, याची कृपया नोंद घ्यावी.अशी विनंती ही शेवटी करण्यात आली
आपण न्याय देण्यासाठी तातडीने सकारात्मक पावले उचलाल, असा विश्वासही व्यक्त
करण्यात आला
या वेळी सोलापूर जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यांतील सराफ सुवर्णकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments