_पंढरपूर दि.१५_
_सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त *विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूर* च्या वतीने दरवर्षी १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा *राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार* या वर्षी पंढरपूर सोनार समाज उपाध्यक्ष *लंकेशदादा काकासाहेब बुराडे* यांना जाहीर करण्यात आला होता._
_*१४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा शिवतिर्थ पंढरपूर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत तो त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले.*_
_या वेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष *मा. नगरसेवक डि राज सर्वगोड,* सचीव *भाई नितीन काळे,* मंदिर समिती सदस्य *ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,* माजी पालकमंत्री *लक्ष्मणराव ढोबळे सर,* म.न.से. नेते *दिलीप बापु धोत्रे,* शेतकरी संघटनेचे *भैय्यासाहेब देशमुख,* DVP उद्योग समुहाचे *अमरजीत पाटील,* पंढरपूर पंचायत समितीचे सभापती *आगावणे,* नगराध्यक्षा *डॉ.प्रणिताताई भालके,* माजी नगराध्यक्षा *उज्जवलाताई भालेराव,* उपनगराध्यक्ष *महादेव धोत्रे,* नगरसेवक *सुनीलजी वाळूजकर,* नगरसेवक *ओंकार जोशी,* आदी मान्यवर उपस्थितीत होते._
_सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजसेवकाची दखल घेऊन प्रतिष्ठान दरवर्षी मानाचा व प्रतिष्ठेचा असणारा पुरस्कार देऊन समाजसेवकांना सन्मानीत करून समाजसेवकांना प्रोत्साहित करत आहे._
_*गेली पंधरा वीस वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंड सुरू आहे, अनेक मातब्बर समाजसेवकांना या पुर्वी सन्मानीत करण्यात आले आहे.*_
_लंकेशदादा बुराडे यांना या पुर्वी सोनार *समाजरत्न,* मुंबईच्या डोंबिवली चा *कनक रत्न* कल्याण मुंबई येथील *समाज भूषण* व अंबाजोगाईचा *युवा सुवर्ण रत्न,* आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे._
_*लंकेशदादा बुराडे हे सोनार समाजाच्या माध्यमातून सामाजिक तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून राजकीय कार्य करत आहेत. पंढरपूर सोनार समाजाचे ते बिनविरोध उपाध्यक्ष तर शिवसेनेचे पंढरपूर शहर समन्वयक म्हणून ते काम करत आहेत, तसेच सर्व शाखीय सोनार समाजाच्या भारतीय नरहरी सेना या संघटनेचे ते प्रदेश महानिरीक्षक म्हणून काम करत आहेत.*_

0 Comments