पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या पारस प्रकाश जाधव व प्रा. आशुतोष अनिलराव गरड यांनी संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण नऊ पेटंट्स प्रकाशित केली आहेत. आदरयुक्त शिस्त, नाईट स्टडी, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समाजोपयोगी नवकल्पना या बाबींच्या समन्वयातून महाविद्यालयाच्या यशात आणखी भर पडली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पारस जाधव यांनी विकसित केलेल्या पेटंट्समध्ये सोलर पॅनल क्लिनिंग सिस्टम, ड्रोन डॉक, सॉइल मॉइश्चर सेन्सर संरक्षण, इलेक्ट्रिकल फॉल्ट डिटेक्शन ग्लोव्ह, कृषी पंपासाठी लिफ्टिंग स्टँड, सॉइल न्यूट्रिएंट अॅनालिसिस, स्मार्ट लिक्विड सिस्टम, मल्टी-सेंसर आधारित चॉपिंग बोर्ड तसेच वॉटर टँक क्लिनिंग डिव्हाइस यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. ही सर्व पेटंट्स केवळ तांत्रिक नवकल्पना नसून शेतकरी व समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहेत. कृषी क्षेत्रातील उपकरणांमुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सॉइल न्यूट्रिएंट अॅनालिसिस व सॉइल सेन्सर तंत्रज्ञानामुळे मातीचे अचूक परीक्षण होऊन शेती अधिक वैज्ञानिक पद्धतीने करता येणार आहे. सोलर पॅनल क्लिनिंग व वॉटर टँक क्लिनिंग डिव्हाइससारख्या प्रकल्पांमुळे ऊर्जा व पाण्याच्या व्यवस्थापनात सुधारणा होऊन स्वच्छता व कार्यक्षमता वाढणार आहे. इलेक्ट्रिकल फॉल्ट डिटेक्शन ग्लोव्ह व हायजेनिक चॉपिंग बोर्ड यांसारख्या संकल्पनांमुळे सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीनेही समाजाला मोठा फायदा होणार आहे. या यशाबद्दल बोलताना पारस जाधव यांनी आवर्जून नमूद केले की, डॉ.रोंगे सरांनी घालून दिलेली शिस्त, स्वेरी मधील संशोधानाचे वातावरण, नाईट स्टडी मध्ये राखलेले सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच संशोधन क्षेत्रातील हे यश शक्य झाले आहे. त्याचबरोबर नियमितपणे घेतले जाणारे प्रशिक्षण व अधिक अभ्यासक्रमासाठी क्लासेस यांचाही यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पारस जाधव यांना पेटंट करीता स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवळकर व प्रा. आशुतोष गरड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्याची परंपरा असून पारस जाधव यांची ही कामगिरी त्या परंपरेचा उत्कृष्ट नमुना मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य बी.पी.रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी पारस जाधव व प्रा. आशुतोष गरड यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments