पंढरपूर शहरातील अर्बन बँक ते जुना दगडी पूल दरम्यानच्या रस्त्यावर असलेले चेंबरचे झाकण धोकादायक बनले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांच्या नेतृत्वाखाली आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाद्वारे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन धोकादायक चेंबरची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी सागर आधटराव, दिनेश आधटराव, राजू तावस्कर, मनोज टोमके, अक्षय धुमाळ, नागेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments