पंढरपूर दि(16)- पंढरपूर महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि.7 मार्च ते 15 मे या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानातंर्गत तालुक्यातील 11 हजार 787 ग्रामस्थांना विविध योजनांचा थेट लाभ मिळाला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
दिनांक 15 मे रोजी पंढरपूर येथील श्रीयश पॅलेस येथे नगरपालिका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मंडळात 3 हजार 288 तर नगरपालिकेमार्फत 60 विविध सेवा व दाखले देण्यात आले.
या अभियानातंर्गत पंढरपूर येथील शिबिरात निकाली काढण्यात आलेले फेरफार 536, सातबारा मधील दुरुस्ती 13, डिजिटल सातबारा 761, 8 अ उतारे 542, प्रमाणपत्रे 1 हजार 22, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज 13, अकृषक परवनगीचे दप्तर अद्यावत करणे-2, अद्यावत अभिलेख 08, वर्ग दोन जमिन वर्ग एक करण्याबाबत कार्यवाही 2, तुकडे बंदी काद्यानुसार खरेदी विक्रीचे व्यवहार नियमानुसार करुन देणे 42,सामाजिक योजना57, शिधापत्रिका 101, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना 05, आभा कार्ड एच.बी, तपासणी व औषधोपचार 179, ई- मोजणी फेरफार नकाशा 05 आदी सेवा व दाखले देण्यात आले.
तसेच नगरपालिकास्तरावर घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करुन देणे 13, प्रधानमंत्री आवास योजना बांधकाम परवाना प्रमाणपत्र वाटप 13, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी 14, न.पा.क्षेत्रातील लाभार्थी जन्म मृत्यू दाखले 10, वाळू नोंदणी लाभार्थी 10 अशा एकूण 60 लाभार्थ्यांना नगरपालिका प्रशासनाकडून लाभ देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
यावेळी आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, पंचायत समिती सभापती शुभम आगवणे, उप सभापती प्रमोद देशमुख, प्रांताधिकारी सचिन इथापे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, दीपक शिंदे आदीसह मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामस्थ तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
0000000

0 Comments