LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराज्य कटलर टोळीला पंढरपूर पोलिसांनी पकडले

शनी अमावस्येच्या निमित्ताने खर्डी येथील सीताराम महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या सोलापूरच्या एका आंतरराज्य कटलर टोळीला पंढरपूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

 शनी अमावस्येनिमित्त खर्डी येथील संत सदगुरु सीताराम महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणे आणि खिसे कापून पैसे लंपास करण्याचे प्रकार या टोळीने केले होते. यापूर्वीही अनेक यात्रांमध्ये या टोळीने चोऱ्या केल्या होत्या.



 पंढरपूरचे डीवायएसपी आयपीएस डॉ. प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर पोलीस या टोळ्यांवर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी सुरज हेंबाडे यांना गुप्त माहिती मिळाली की, ही चोरट्यांची टोळी चोऱ्या करून खर्डीकडून पंढरपूरच्या दिशेने जात आहेत.. 



सदरची महत्त्वपूर्ण माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत डगळे व त्यांच्या टीमने सांगोला चौक येथे सापळा रचला. संशयित क्रूझर गाडी तेथून जात असताना पोलिसांनी ती क्रुझर गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत डगळे यांनी आधीच केलेल्या नाकाबंदीमुळे आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.



पंढरपूर शहरातील सांगोला चौक येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आणून गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 सदरची यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सुरज हेंबाडे व त्यांच्या टीमने केली आहे. गेल्या काही दिवसांत सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर आणि तालुक्यात पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत..

Post a Comment

0 Comments