सोलापूर, दि. — राष्ट्रीय महामार्ग 465 अंतर्गत मोहोळ–कुरुल–कामती–तेरा मैल–बसवनगर–औराद–बंकलगी–वळसंग या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्याचे 2/4 पदरीकरण पेव्ड शोल्डरसह करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 81.37 किमी असून अंदाजित खर्च रुपये 740.38 कोटी इतका आहे.
या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिताताई शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्रीय स्टँडिंग फायनान्स कमिटीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या उन्नतीकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरक्षित व जलद होणार असून ग्रामीण व शहरी भागांमधील संपर्क सुधारेल. तसेच व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर कामास सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments