LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुर्दैवी घटनांतील मंद्रूप येथील चव्हाण व बाळगी येथील कस्तुरे कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सांत्वन*


दक्षिण सोलापूर तालुक्यातील नाईकनगर तांडा (मंद्रूपजवळ) येथे एकाच कुटुंबातील दोन कोवळ्या जीवांचा झालेला दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे.
समर्थ मोहन चव्हाण (वय १३) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १२) हे दोघे चुलत भाऊ खेळत असताना गावाजवळील शेतातील तळ्यात बुडून मृत्युमुखी पडले. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे.

तसेच, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने मोहिनी महेश कस्तुरे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कस्तुरे कुटुंबावर ओढवलेले हे दुःखही अत्यंत असह्य आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले व त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

दोन निष्पाप मुलांचे अकाली निधन आणि एका महिलेचा सर्पदंशाने झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती चव्हाण व कस्तुरे कुटुंबियांना परमेश्वर देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

तसेच, या दोन्ही घटनांमध्ये शासनाकडून मिळू शकणारी आर्थिक मदत, आपत्ती सहाय्यता किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ संबंधित कुटुंबियांना मिळवून देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments