LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.) यांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई "




 प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार पंढरपूर शहरातील इसबावी भागात वेगवेगळया दोन ठिकाणी काही इसम अवैधपणे देशीविदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने मा. श्री प्रशांत डगळे साो, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर हे स्वतः व त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकासह पंढरपूर शहरातील इसबावी भागात शिंदे चौक व सहयाद्री नगर येथे बातमीतील ठिकाणी गेले असता, शिंदे चौक इसबावी येथे महिलानामे दिपाबाई ज्ञानेश्वर काळे ही राहते घराचे बाजूला निळया रंगाच्या प्लॉस्टिक बॅरलमध्ये १०० लि. हातभटटी दारू विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने तिस गराडा घालून पकडले असता तिचे ताब्यात १०,०००/- रु किंमतीची हा.भ. दारू मिळून आली. त्यानंतर सहयाद्री नगर इसबावी येथे पञ्याचे खोलीशेजारी आडोशाला १५ ते २० इसम दारू पिताना दिसून आल्याने जवळच महिलानामे शोभा गणेश देशमुख घराचेसमोर पांढऱ्या रंगाच्या पिशव्यात देशी विदेशी दारूच्या बाटल्या घेवून विक्री करत असल्याचे दिसून तिस पोलीस पथकाने पकडले असता तिचे ताब्यात देशी विदेशी दारूंचा १७०२०/- रू माल मिळून आला सदरबाबत तिचेकडे चौकशी करता तिने सदर देशी विदेशी दारूंची खरेदी व विक्री तिचा पती गणेश सुनिल देशमुख हे करीत असल्याचे सांगितले.

येणेप्रमाणे २७,०२०/- रू किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने दिपाबाई ज्ञानेश्वर काळे रा. शिंदेचौक इसबावी व शोभा गणेश देशमुख व गणेश सुनिल देशमुख यांचेविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.

मा. श्री प्रशांत डगळे साो, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालु असल्यास आम्हास संपर्क करावा व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकादेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील अशा समाजविघातक लोकांवर प्रचलित कायदयानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.

सदरची कारवाई मा. श्री प्रशांत डगळे साो, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/३९६ हेंबाडे, मपोहेकॉ/२८१ राऊत, पोना/४२७ शिंदे, पोना/१३८३ चव्हाण, पोकॉ/२०३६ माने, पोकॉ/६२४ घायाळ, पोकॉ/१४२३ लोंढे, पोकॉ २११० हुलजंती यांनी पार पाडलेली आहे.

Post a Comment

0 Comments