LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *सोलापुरात विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी : खासदार प्रणिती शिंदे*


संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात निवडणूक आयोगामार्फत विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन नावे समाविष्ट करणे, चुकीची नावे दुरुस्त करणे, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच बूथ फेररचना आदी कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची भेट घेऊन SIR प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी सोलापूर पूर्व जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष संदीप साठे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, अशोक निंबर्गी, पंढरपूर शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, मोहोळ शहराध्यक्ष किशोर पवार, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अर्जुन पाटील, रविकिरण कोळेकर, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, परशुराम सतारेवाले, तिरुपती परकीपंडला, शिरीष चव्हाण, अब्दुल खलील मुल्ला, संजय बनसोडे, शिवशंकर अंजनाळकर, लक्ष्मीकांत साका, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, नागेश म्याकल, विवेक कन्ना आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, SIR प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबवली गेली पाहिजे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम न करता प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन प्रक्रिया राबवावी. या प्रक्रियेत बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनाही सोबत घेणे आवश्यक असून त्यामुळे मतदार याद्यांबाबत कोणताही संशय राहणार नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक मतदाराने एन्युमरेशन फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत जमा करणे अत्यंत गरजेचे आहे. फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती, फोटो आणि सही अचूक असणे आवश्यक असून फॉर्म न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांनी सतर्क राहून स्वतःचे नाव मतदार यादीत कायम आहे का याची खात्री करून घ्यावी.

खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी गंभीर चिंता व्यक्त करत सांगितले की, काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये SIR प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधकांच्या मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचे आरोप झाले होते. बंगाल आणि बिहार निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या असून सोलापूरमध्येही तसे होऊ नये यासाठी काँग्रेस पक्ष सतर्क आहे. मतदारांची नावे वगळण्याची कोणतीही प्रक्रिया पारदर्शक असावी, कमी करण्यात आलेल्या नावांची यादी उपलब्ध करून द्यावी तसेच BLO यांची नावेही सार्वजनिक करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांनी तात्काळ संपर्क साधावा, प्रशासनावर पारदर्शक प्रक्रिया राबविण्यासाठी लोकशाही मार्गाने दबाव निर्माण केला जाईल आणि प्रत्येक पात्र मतदाराचे मतदानाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचेही खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले की, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकरीत्या वगळले जाणार नाही याची प्रशासन दक्षता घेईल असे सांगितले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments